राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने माजलगाव येथे दिव्यांग, अपंग वित्त महामंडळाच्या योजना विषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न
माजलगाव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने माजलगाव येथे दिव्यांग, अपंग वित्त महामंडळाच्या योजना विषयी मार्गदर्शन शिबिर दिनांक 30 /12/2023 छत्रपती नगर बायपास रोड माजलगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य प्रवक्ते रोहिदासजी बनसोडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजप युवा नेते राहुल भैया जगताप, विशेष उपस्थिती एन. डी. शिंदे साहेब, सुनील शिंदे , धम्मानंद भाऊ साळवे, दीपक मुंडे, निमंत्रक नानासाहेब घोडके राष्ट्रीय चर्मकार महासंघ बीड जिल्हाध्यक्ष, युवा जिल्हाध्यक्ष राजेश जाधव, आयोजक माजलगाव तालुका अध्यक्ष सुभाष कांबळे, आणि युवा नेते संतोष जाधव, संतोष खंडागळे, विजय नरहिरे, दत्ता जाधव उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सुभाष कांबळे यांनी केले.