हजरत महंमद पैगंबर कन्यारत्न योजनेचा अनोखा उपक्रम साजरा
कळंब(धनाजी भालेराव)- सार्वजनिक सण उत्सव व कळंब शहराचं नातं तसं सर्वांच्या परिचयाचे आहे. परंतु आजवर कळंब शहरात सार्वजनिक कार्यक्रमात प्रथम प्राधान्य देण्यात येते ते स्वतःच्या जाहिराती करणारे होल्डिंग बॅनर व कान कर्कश्य करणारे डीजे साउंड सिस्टीमच्या आवाजाला. परंतु या प्रथेला मूठ माती देत दयावान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला व सरकार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कलीम शेख यांनी संयुक्तरीत्या कळंब शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच पोलीस प्रशासनामार्फत डीजे मुक्त सण साजरे करण्याच्या आव्हानाला साथ देत ईद-ए- मिलाद म्हणजे महंमद पैगंबर जयंती उत्सव डीजेच्या कर्कश आवाजात साजरी न करता कळंब शहर तसेच परिसरातील सर्व धर्मीय अनाथ व आर्थिक परिस्थिती बेताच्या असलेल्या कुटुंबातील मुलींच्या नावाने बँकेत मुदत ठेव (FD) योजनेमध्ये पैसे टाकण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला. यामध्ये कुठलाही जातीभेद न पाहता सर्व समाजातून १५ मुलीच्या नावाने सात हजार पाचशे रुपयांची एफडी करण्यात आली. ही रक्कम त्यांना १८ वर्षानंतर ५८,८४६ एवढ्या रक्कमेत मिळणार आहे. या निर्णयामुळे वय वर्ष ७ च्या आतील आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या व अनाथ मुली यांच्या भविष्य निर्वाह साठी ही रक्कम त्यांना १८ वर्षानंतर मिळणार आहे. जेणेकरून त्यांना ही रक्कम त्यांच्या ऐन उभारीच्या वयात व खऱ्या अर्थाने जेव्हा पैशाची गरज असते या कालावधीमध्ये उपयोगी पडतील याहेतूने ही मुदत ठेव करण्यात येणार आहे.दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी दारुल-उलुम बज़मे अनवारे सोफिया, मक्का मज्जिद ढोकी रोड, येथे आमदार कैलास पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, पोलीस निरीक्षक रवी सानप, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, माजी नगराध्यक्ष संजयजी मुंदडा, प्रदीप मेटे, अमजद मुल्ला, विश्वजीत जाधव, श्याम खबाले, शिवाजी गिड्डे, संदीप बाविकर, बाळकृष्ण भवर, ज्येष्ठ नागरिक महादेव अडसूळ, डि ,के,कुलकर्णी, मोहेकर मल्टीस्टेट चे मॅनेजर मडके, संभाजी ब्रिगेडचे अॅड. तानाजी चौधरी, भारत सांगळे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा युवक अध्यक्ष विकास कदम, दत्ता तनपुरे, प्रणव नरहिरे, बालाजी अडसूळ,सरला सरवदे, वनिता कटाळे,सरोजिनी राऊत, रुकसाना बागवान, मुस्ताक कुरेशी,मुख्तार मिर्झा ,तारेख मिर्झा,मिनाज शेख, मुसदीक काझी,अकिब पटेल,फाहद चाऊस,भैय्यासाहेब खंडागळे, रफीक सय्यद,नाना धाकतोडे,हाफिस खालेद,हाफिज आरेफ,हाफिज वासिम, हाफिज आली. यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी दयावान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला,सरकार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कलीम शेख, ग्रामपंचायत सदस्य मुबीन मनियार,समीर सय्यद, अलीम दारूवाले, हुजेब बागवान, बिलाल बागवान, फरमान सय्यद,मोहसीन मुल्ला,अभय गायकवाड, सम्राट गायकवाड, इम्रान काझी, तानाजी चव्हाण,शफिक शेख, अमर मुल्ला,नादेर शेख, अमर पठाण, इम्रान खान, रिजवान खान, उमर शेख, मोसिन सय्यद,हुसैन शेख,अजीम शेख,वसीम शिकलकर, मोइन मनियार, साहिल मनियार, मुस्तखिम मनियार,अमन मनियार, मुदस्सिर मनियार,आलिशान पठान ,निहाल पठान, हमीद मनियार,रियाज पठान ,सत्तार पठान, अजीम पठान,समीर शेख,सईद शिकलकार,विकी सय्यद,तारेख शेख,सद्दाम शेख,अख्तर शिकलकर, मकसूद शिकलकर, अमीन सय्यद, वसीम शेख, आवेज शिकलकर, आसिम शिकलकर, साद मनियार, जुबेर शेख, हयात खान, शारेफ शेख, समीर कुरैशी, इजराइल शेख, रेहान खान, तूहित अत्तार, रिजवान खान, आसिम शेख, दानिश शेख,अखिल मनियार, शबाज सय्यद, इसाक शेख, इरफान शेख, गुड्डू शेख, शानवाज शेख, इमरान अत्तर, शाबाज खान, दयावान प्रतिष्ठान व सरकार ग्रुप सर्व मित्र परिवाराने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय चर्मकार महासंघ मराठवाडा युवक अध्यक्ष विकास कदम यांनी केले.