राष्ट्रीय चर्मकार महासंघाची कार्यकारणी जाहीर
केज(धनाजी भालेराव)- राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलपसाहेब ( नाना ) यांच्या आदेशानुसार व माधवराव गायकवाड प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठवाडा युवा अध्यक्ष विकास कदम प्रमुख पाहुणे, नानासाहेब घोडके बीड जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली केज येथे बैठक आयोजित करण्यात आली. प्रमुख उपस्थिती युवा जिल्हाध्यक्ष राजेश जाधव, कर्मचारी जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला जिल्हाध्यक्षा शारदाताई वाघमारे, माजी जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा माने, जिल्हा सचिव ॲड. दत्ता जाधव, जिल्हा उपाध्यक्ष बालासाहेब गवळी, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर ठोसर, माजलगाव तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे व मार्गदर्शक शंकर पाखरे सर या सर्वांच्या उपस्थितीत केज जिल्हा व तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.
खालील प्रमाणे
जिल्हा सल्लागार ॲड. लक्ष्मण माने सर, कर्मचारी सं.जिल्हा उपाध्यक्ष बाळनाथ वाघमारे सर, कर्मचारी सं.जिल्हा संघटक शंकर ठोंबरे, युवा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घुंमरे, तसेच तालुकाध्यक्ष अरुण राऊत, उपाध्यक्ष बंडु पौळ, युवा तालुकाध्यक्ष लिंबराज ठोंबरे, उपाध्यक्ष अशोक पाखरे, उद्योजक क्लब तालुकाध्यक्ष राजेभाऊ हंकारे, उपाध्यक्ष दिनकर शिंदे, कर्मचारी तालुकाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे सर, शहर अध्यक्ष प्रमोद तांदळे, गटइ सेल तालुकाध्यक्ष जालिंदर राऊत या सर्व पदाधिकारी यांची निवड सर्वानुमते सर्व पदाधिकारी व समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन बाळनाथ वाघमारे व सुर्यकांत वाघमारे सर यांनी केले आणि सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन शंकर ठोंबरे यांनी केले.