नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. 2 कळंब येथे प्रवेश उत्सव विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा
कळंब – नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. 2 कळंब येथे आज दिनांक 15 जून 2024 रोजी प्रवेश उत्सव विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रथम उपस्थितांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन इयत्ता पहिली वर्गात दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, फुगे, आणि नवीन पाठ्यपुस्तक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद नांगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून शाळेच्या गुणवत्ता विकासद्दल आणि भौतिक सुविधेबद्दल उपस्थितांना माहिती देऊन परिसरातील 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शाळेत प्रवेशित करण्याची विनंती केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुनीरोद्दीन शेख, प्रमुख पाहुणे नगर परिषद कळंबचे कार्यालयीन अधिक्षक एल. एस.वाघमारे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ.रुपाली विजय खोसे, विनोद कोकाटे, पूजा हौसलमल, अनिता कांबळे, राणी मोदी, वैशाली पवार यांच्यासह परिसरातील माता-पालक उपस्थित होते .
प्रवेश उत्सवाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल वाघमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक रमेश चव्हाण, प्रशांत सलगरे, विशाल वाघमारे, अमोल चव्हाण, विनोद राऊत, सयाराणी क-हाड, सोनाली पाटील, गिताश्री नागटिळक, सेविका पुतळाबाई हौसलमल आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.