ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली महाराज पुण्यतिथीनिमित्त कळंब येथून माऊली भक्तांच्यावतीने १०१ साखरेचे पोते श्री क्षेत्र चाकरवाडीकडे रवाना
कळंब. :- श्री क्षेत्र चाकरवाडी येथे ह. भ .प. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या २४ व्या पुण्यस्मरणार्थ द्वीतपपूर्ती सोहळा यानिमित्त दिनांक १५ जून ते २१ जून (वटपोर्णिमा ) श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री राम कथा ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न होत आहे. यानिमित्त कळंब शहरातील माऊली भक्त गेली २४ वर्षापासून प्रतिवर्षी १०१ पोते साखर पाठवतात. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक १४ जून रोजी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर एल.जी .जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली भक्तांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून १०१ पोते साखर असलेला टेम्पो कळंबहुन श्री क्षेत्र चाकरवाडीकडे रवाना करण्यात आला. याप्रसंगी डॉ. एल.जी. जाधवर, युवराज मुरकुटे (विमा प्रतिनिधी), रामहरी चाटे (पो.उ.नि.), रामहरी कोल्हे संचालक ( कृ.ऊ.बा.स. ), व्यापारी राजेश ओझा, दिलीप टोणगे ,करसन पटेल , आशोक बोराडे , सुरेश टेकाळे (जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघ), सुरेश कल्याणकर, नाना जाधवर , डॉ. अभिजीत जाधवर, राजेंद्र बिक्कड ( मुख्याध्यापक), शरद जाधवर सर, अशोक मोडवे, डॉ.अविनाश जाधवर , शिवाजी केंद्रे , पिंटू जाधवर , विशाल जाधवर , संजय देशमुख, भाजपा नेते माणिक बोंदर यांच्यासह माऊली भक्तांची उपस्थिती होती.