कळंबमध्ये पथनाट्य व रस्ता सुरक्षा जागरूकता रॅली
कळंब – कळंब येथे विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कुल, केज यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जागरुक सप्ताह कळंब येथे उत्साहात साजरा करण्यात आला.राज्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे. याच अनुषंगाने विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल येथील विद्यार्थ्यांनी रॅली व पथ नाट्य याद्वारे जनजागृती केली.रॅलीला कळंब पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक रामहारी चाटेसाहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि काही सूचना ही केल्या.यावेळी कळंब पत्रकार संघाचे अध्यक्ष सतिश बप्पा टोणगे,डॉ.अभिजित लोढे,अप्टेक कॉम्प्युटरचे संजय घुले सर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा युवक अध्यक्ष विकास कदम, व्यवसायिक शिवाजी सिरसाट,प्रिन्सिपल आनंद मरळगोईकर सर,प्राचार्य किशोर मोरे सर,अमर मुल्लासाहेब,शिक्षक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी कळंब पोलिस स्टेशनचे कर्मचारी मायंदे साहेब,मुंडे साहेब, शेख साहेब यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले.